
‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. मनूची माया टीचर सतत तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आशुतोषने आता टोकाचा निर्णय घेतला आहे.







