
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही तरी घडताना दिसत आहे. कधी आशुतोष अरुंधतीमध्ये काही तरी सुरु असते तर कधी यश, अभी, ईशाच्या आयुष्यात सावळा गोंधळ सुरु असतो. गेल्या काही दिवसांपासून ईशाचे वागणे हे अनिशला खटकत आहे. त्या दोघांमध्ये जराही एकमत होताना दिसत नाही. आता त्या दोघांचा घटस्फोट होणार की काय? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे.






