
ते सगळं ऐकून अरुंधती म्हणते, ‘काय कारण असू शकतं? आई, त्यांनी हेच माझ्या वाढदिवसाला देखील केलं होतं. संजनाला घेऊन आले होते आणि केक कापला होता. बायकोसोबत असंच वागायचं असतं, असं काही आहे का त्यांच्या डोक्यात? अन्याय आणि अपमान सहन करुन नकोस. मी जी चुक केली ती तू करु नकोस. तुझ्याकडे बघून मला बळ मिळालं आहे. तू खचून जाऊ नकोस. आज तुझा वाढदिवस आहे. देवानं तुला चांगलं आरोग्य दिलंय, त्याच्यासाठी आभार त्याचे मान. तुला दु:खी करायचा अधिकार कोणालाही देऊ नको.’








