प्रा. रमेश आढाव सरांना अश्रूपूरित श्रद्धांजली; पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण

0
5
प्रा. रमेश आढाव सरांना अश्रूपूरित श्रद्धांजली; पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण

फलटण (साहस Times ) : “धाडसी, निर्भीड आणि असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक असलेले प्रा. रमेश आढाव सर आज आपल्यात नाहीत, हे वास्तव असह्य आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचा एक उज्वल दीप मालवला गेला आहे,” अशा भावना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष प्रा. रमेश आढाव यांच्या निधनानंतर आयोजित शोकसभेला महाराजा मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, संचालक शिवरूपराजे खर्डेकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, अरविंद मेहता, रामभाऊ ढेकळे, अभिजीत नाईक निंबाळकर, तानाजीराव जगताप, प्राचार्य सुधीर इंगळे, रवींद्र येवले, दादासाहेब चोरमले, नानासो इवरे, डॉ. जे. टी. पोळ, शेखर कांबळे, प्रा. रविंद्र कोकरे, प्रा. सतीश जंगम, स. रा. मोहिते, सचिन मोरे, सनी काकडे, प्रदीप झणझणे, सौ. कांताबाई काकडे, अमित रनवरे, सुपर्णा सनी अहिवळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शोकसभेला प्रा. आढाव यांच्या पत्नी वंदना आढाव, चिरंजीव ऋषिकेश आढाव, सून उन्नती आढाव, मुलगी तेजस्विनी काकडे, जावई मनोज काकडे, बंधू विलास आढाव यांनी उपस्थित राहून सर्वांचे आभार मानले.

तत्पूर्वी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी आढाव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले.

सौ. मनीषा कांबळे, बापूराव काशीद, संजय देशमुख, ह. भ. प. नवनाथ कोलवडकर, मंगेश आवळे, तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.