फलटण येथील तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव व साहस क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवानिमित्त आढावा बैठक

0
35
फलटण येथील तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव व साहस क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवानिमित्त आढावा बैठक

फलटण : फलटण शहरातील तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव , साहस क्रिडा मंडळ द्वारा आयोजित सालाबाद प्रमाणे याही वर्षी साजरी करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या वतीने मागील वर्षाच्या अहवाल सादरीकरण आणि यावर्षीच्या नियोजनाच्या संबंधी आढाव बैठकीचे आयोजन म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर ) फलटण येथे आयोजित करण्यात आले होते . यामध्ये फलटण नगर परिषदेचे कर्मचारी ( कामगार युनियन ) व वसाहती मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी २०२३ रोजी साजरी करण्यात आलेला तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सवाच्या अहवाल याठिकाणी सादर करण्यात आला व यावर्षी साजरा होणारे जयंती महोत्सवाच्या आढावा घेण्यात आला यामध्ये मागील वर्ष झालेल्या जमा खर्चाची सर्व तपशीलवार मांडण्यात करण्यात आला होती

तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंती महोत्सव समिती  आणि साहस क्रीडा मंडळाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आकर्षक सजावट, देखावे, मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने महोत्सव समिती आणि साहस क्रीडा मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले होते. यामध्ये नगर परिषदेतील कामगारांना मसाला दूध वाटप. शहरातील विविध हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप तसेच कालकथित प्रेमा वसंत काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.


या मिरवणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त, शाहू महाराज तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि भगवान बुद्धांची प्रतिमा असलेल्या सहा ट्रॉली आकर्षक सजावट करून तयार करण्यात आल्या होत्या. शहरातील मंगळवार पेठ येथून या मिरवणुकीची सुरवात करून विविध भागातून हि मिरवणूक काढण्यात आली.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने सन 2023 मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात व सुंदर साजरी केली………………….यावर्षी ही आपल्या मनातील तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव साजरी करणे साठी आपण सर्वांनी सहकार्य करावे दि.23 मे, 2024 रोजी बुद्ध जयंती शोभायात्रेत बहुसंख्येने सामील व्हावे ही

विनंती……………….नमो बुद्धाय… जय भीम