Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रगोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना ‘पुणे रत्न सन्मान २०२५’...

गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना ‘पुणे रत्न सन्मान २०२५’ पुरस्कार

फलटण  — फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उद्योग क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘लोकशाही मराठी पुणे रत्न सन्मान २०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुणे येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात लोकशाही मराठीच्या वतीने पुणे रत्न पुरस्कारांचे वितरण झाले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने गोविंद मिल्कच्या अकाउंट व फायनान्स विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल चावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागातील शेकडो महिला, शेतकरी व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. फलटणमध्ये गोविंद मिल्कची स्थापना करून त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासात श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक व सीईओ श्री. धर्मेंद्र भल्ला, तसेच दुधउत्पादक महिला व शेतकरी बांधवांचा मोलाचा सहभाग आहे.

या सन्मानाबद्दल विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments