Sunday, September 13, 2026
Homeसाताराराजुरीच्या कुरवली पाटी चौकात अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, स्थानिकांमध्ये संतापाचा वातावरण

राजुरीच्या कुरवली पाटी चौकात अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, स्थानिकांमध्ये संतापाचा वातावरण

राजुरी (प्रतिनिधी ):राजुरी गावातील कुरवली पाटी चौकात सायंकाळी सुमारे 6.30 च्या सुमारास एक दुचाकी आणि चारचाकी वाहन यांच्यात जबरदस्त धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या भागात वारंवार अपघात होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, कुरवली पाटी चौकात अपघात टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.

दर दोन दिवसांनी अपघात घडत असल्यामुळे जनतेत खळबळ माजली आहे. काही वेळा अपघातांमुळे वादविवाद व वाहनचालकांमध्ये मारहाणीच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने लवकरात लवकर या परिसरात ट्रॅफिक नियमन, सीसीटीव्ही, स्पीड ब्रेकर अशा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments