Wednesday, September 16, 2026
Homeसातारानायगावच्या मातीला मिळणार ‘सावित्री-ज्योती’चा भव्य सन्मान!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार...

नायगावच्या मातीला मिळणार ‘सावित्री-ज्योती’चा भव्य सन्मान!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक निर्णय

नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकासह महिलांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून, या दोन्ही प्रकल्पांसाठी तब्बल १४३ कोटींपेक्षा अधिक निधीची मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी देण्यात आली.

या भव्य स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख रुपये, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

३ जानेवारी रोजी नायगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीची घोषणा केली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या आराखड्यात पुतळा, चौथरा, कलादालन, महिला प्रशिक्षण केंद्र, कार्यालय, महिला निवास वसतीगृह, विश्रांतीगृह, बैठक कक्ष, कॅंटीन, भित्तीचित्रे, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ता, बागबगिचा, वाहनतळ, अग्निशामक यंत्रणा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युतीकरण, प्रेक्षागृह आणि सीसीटीव्ही यंत्रणा यांचा समावेश करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे नायगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गावात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ना. जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द खरा करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सावित्रीबाईंच्या कार्याला साजेसा स्मारक साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments