Sunday, September 13, 2026
Homeसातारादुष्काळी वाखरीच्या सुपुत्रीचा जागतिक झळाळीत डंका! आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अक्षता ढेकळे यांना शिवछत्रपती...

दुष्काळी वाखरीच्या सुपुत्रीचा जागतिक झळाळीत डंका! आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अक्षता ढेकळे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

फलटण (प्रतिनिधी): दुष्काळी पट्ट्यातील वाखरी (ता. फलटण) या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेली आणि अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला हॉकीमध्ये ठसा उमटवणारी कु. अक्षता आबासाहेब ढेकळे हिला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सोहळ्याद्वारे होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे.

30 वर्षांनंतर हॉकी खेळाला मिळालेला सन्मान!
सुमारे 30 वर्षांनंतर हॉकीसारख्या खेळाला हा बहुमान मिळाला असून, अक्षता ढेकळे ही अशा प्रकारे शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी गुणी खेळाडू ठरली आहे.

अंतरराष्ट्रीय चमक:
अक्षता हिने साउथ अमेरिका, नेदरलँड्स, बेल्जियम, इंग्लंड, स्पेन, ओमान, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स यासारख्या देशांत झालेल्या 9 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ती एशिया कप सुवर्ण पदक विजेता, वर्ल्ड कप रजत पदक विजेता, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता असून, तिने आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय, 24 राष्ट्रीय व 13 राज्यस्तरीय पदके पटकावली आहेत.

एकाच वर्षी सीनियर व जूनियर वर्ल्ड कप खेळणारी पहिली महिला!
अक्षता ही एकाच वर्षी सीनियर व जूनियर वर्ल्ड कपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली आहे. तिने सर्वात कमी वयात भारतीय सीनियर महिला संघातून वर्ल्ड कप खेळण्याचा मान मिळवला आहे.

या पुरस्काराबद्दल अक्षता हिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या यशामुळे फलटण वाखरीसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्वल झाले आहे.

साहस टाइम्सकडून अक्षता ढेकळे हिला मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments