Saturday, August 22, 2026
Homeसाताराक्रांतिसूर्य फुलेंच्या जयंतीला फलटणमध्ये ऐतिहासिक उत्साह; नव्या स्मारकाचे नगरपरिषदेला हस्तांतर

क्रांतिसूर्य फुलेंच्या जयंतीला फलटणमध्ये ऐतिहासिक उत्साह; नव्या स्मारकाचे नगरपरिषदेला हस्तांतर


फलटण – क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभूतपूर्व उत्साह पहायला मिळाला. नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या महात्मा फुले स्मारकाचे नगरपरिषदेला हस्तांतर करण्यात आले असून, शासनाचा निधी न घेता लोकवर्गणी आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने तयार झालेल्या या स्मारकाने एक नवा आदर्श घालून दिला आहे.

फलटण येथील क्रांतिभूमी स्मारकावर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, भाजपा नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवराज अनिकेतराजे, अमरसिंह नाईक निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मिलिंद नेवसे, विवेक शिंदे, शंकर आप्पा माडकर आदींचा समावेश होता.

सकाळी ५ वाजता तालुक्यातून आलेल्या १०० सायकलस्वारांच्या सहभागाने फलटण ते तरडगाव अशी ‘समता सायकल रॅली’ काढण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक शैक्षणिक विचारमंच, चौधरवाडीच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात तरुणांसह जेष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला. तुकाराम कोकाटे, राधेश्याम खंडेलवाल आणि चंद्रकांत मिसाळ यांनी या रॅलीत सक्रिय सहभाग घेतला.

फुले जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, मराठा क्रांती मोर्चा, सृजन फाऊंडेशन, महात्मा फुले विचार अभियान, मुस्लिम बांधव, फलटण तालुका वकील संघ, मराठी पत्रकार परिषद, मुधोजी हायस्कूल व आयडियल इंटरनॅशनल स्कूल अशा अनेक संघटनांनी एकत्र येत महात्मा फुलेंना सामूहिक अभिवादन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments