Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा ठेकेदार व पुढाऱ्यांना स्पष्ट इशारा – "कामाचा दर्जा ठेवा नाहीतर...

अजित पवारांचा ठेकेदार व पुढाऱ्यांना स्पष्ट इशारा – “कामाचा दर्जा ठेवा नाहीतर मी अडचणीत येईल!”

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२९ मार्च) बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शेतकरी मेळाव्यात ठेकेदार व पुढाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. “मी शंभरदा सांगितलं, एकतर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बना. तुम्ही पुढारी बनणार, माझ्याकडून कामे घेणार आणि कामाचा दर्जा राहिला नाही, तर मी पुन्हा अडचणीत येणार. लोकं म्हणतील, अजित पवारांना हे दिसत नाही का?” अशा शब्दांत त्यांनी ठेकेदार व स्थानिक नेत्यांना सजग केलं.

बारामतीसाठी १ हजार कोटींची कामे मंजूर

अजित पवार यांनी आपल्या भाषणात बारामतीसाठी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. “राज्यात असं कुठे घडलं आहे का? शंभर दिवसांत १ हजार कोटी रुपये बारामतीसाठी मंजूर केले. जानाई शिरसाई बंद पाईपलाईन योजनेसाठी ४६० कोटी रुपये, पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी ५६० कोटी रुपये. याआधी असं कधी झालं होतं का?” असा सवाल करत त्यांनी आपली कार्यक्षमता स्पष्ट केली.

“फोटो काढून प्रश्न सुटत नाहीत, प्रशासनावर दरारा असावा लागतो”

अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत, “मी बाकीच्यांसारखं कुठे भेटायला गेलो की फोटो काढायचा, कुणाला नमस्कार केला की त्याचा फोटो काढायचा आणि तो सगळीकडे दाखवायचा – असं करून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी कष्ट आणि प्रशासनावर दरारा असावा लागतो,” असे ठणकावले.

“संस्थेवर कोणताही डाग लागू देणार नाही”

संस्था टिकवण्याच्या वचनावर बोलताना पवार म्हणाले, “तुम्ही-आम्ही आज आहोत, उद्या नसू. पण संस्था कायम राहणार आहेत. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत संस्थेला टीचभरही चुकीचा डाग लागू देणार नाही. आणि जर मला यापुढे काही जमणार नसेल, तर मी स्पष्ट सांगेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments