Thursday, September 17, 2026
Homeसातारागुढीपाडव्याला आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 76 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी...

गुढीपाडव्याला आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 76 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार

फलटण : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा 76 वा वाढदिवस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, दिनांक 30 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आदींचा समावेश आहे.

माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी ही माहिती देताना सांगितले की, धोम-बलकवडी, निरा देवघर, एम. आय. डी. सी. सारखे महत्त्वाचे प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा लाभ तालुक्यातील जनतेला मिळत असून, त्यांचे कार्य जनतेच्या प्रगतीसाठी नेहमीच पुढे राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून समाजोपयोगी कार्य करण्यात येणार आहे.

यावेळी दीपकराव चव्हाण यांनी सांगितले की, “महाराज साहेबांचा वाढदिवस हा केवळ एक व्यक्तिगत सोहळा नसून, तो संपूर्ण तालुक्यासाठी एक आनंदाचा उत्सव असतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लक्ष्मी-विलास पॅलेस, लक्ष्मीनगर, फलटण येथे दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments