Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रपिलीवमध्ये 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; संशयित दोघे ताब्यात

पिलीवमध्ये 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; संशयित दोघे ताब्यात

माळशिरस: माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे 28 वर्षीय युवकाची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश अंकुश खुर्द (वय 28) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून, त्याचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह मंगळवारी पिलीव-माळशिरस रस्त्यालगतच्या वनक्षेत्रात आढळून आला.

हत्या करण्यापूर्वी अमानुष छळ
सोमवारी (10 मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास आकाश आपल्या घरी कुटुंबियांसोबत असताना त्याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. “दहा मिनिटांत परत येतो,” असे सांगून तो घराबाहेर गेला. मात्र, रात्रीभर परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. शरीरावर पाठीवर, दंडावर, मांडीवर आणि पोटावर गंभीर मारहाणीच्या खुणा व चटके असल्याचे आढळले.

प्रेमप्रकरणाचा संशय, दोन संशयित ताब्यात
प्राथमिक तपासात प्रेमसंबंध किंवा अनैतिक प्रकरणातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. एका युवकाची इतक्या अमानुषपणे हत्या झाल्याने पिलीव व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments