Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रवाघळवाडीत टोळक्याचा दहशतवाद! कोयता, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

वाघळवाडीत टोळक्याचा दहशतवाद! कोयता, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला

बारामती | “आम्ही कोण आहोत, तुम्हाला माहीत आहे का?” असे म्हणत सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयता, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वाघळवाडी (कन्नडवस्ती), ता. बारामती येथे घडली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

संकेत राजेंद्र शेवाळे (वय 27, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी ऋतीक उर्फ काल्या रावळकर, प्रमोद जगताप, सोनू नवले, भावेश रावळकर, पंकज सुहास पाटील, रणजीत रावळकर (सर्व रा. वाघळवाडी कन्नडवस्ती, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

घटनाक्रम:

दि. 8 मार्च रोजी रात्री 10 वाजता, फिर्यादी व त्यांचे मित्र सोमेश्वर करंजेपुल येथील ‘जय भवानी हॉटेल’ येथे जेवण करून साखरवाडीला परतत होते. यावेळी आरोपी क्रमांक 1 आणि 4 यांनी त्यांचा पाठलाग करून कॅनॉलजवळ अडवले. “आम्ही गुन्हेगार आहोत, तुम्ही कुणाच्या नादाला लागत आहात” असे धमकी देत आरोपी क्रमांक 1 ने मोबाईलवरून अन्य साथीदारांना “सर्वजण मटेरीअल घेऊन कॅनॉल पुलावर या” असा संदेश दिला.

थोड्याच वेळात आरोपी क्रमांक 2 कोयता घेऊन, तर आरोपी क्रमांक 3 आणि 5 लोखंडी पाईप घेऊन घटनास्थळी आले. आरोपी क्रमांक 6 लाकडी दांडका घेऊन धावत आला. सर्वांनी हवेत शस्त्रे नाचवून परिसरात दहशत माजवली आणि शिवीगाळ करत हल्ला केला.

हल्ल्यातील जखमी:

  • आरोपी क्रमांक 2 ने फिर्यादीच्या मित्र योगेशच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र योगेशने वेळेत डोके मागे घेतल्याने त्याच्या हनुवटीवर गंभीर जखम झाली.
  • आरोपी क्रमांक 6 ने लाकडी दांडक्याने शुभमच्या पाठीवर मारले.
  • आरोपी क्रमांक 4 ने योगेशच्या मांडीवर व पाठीवर लोखंडी पाईपने वार केले.
  • आरोपी क्रमांक 3 ने लोखंडी पाईपने शुभमच्या मांडीवर आणि डाव्या हातावर मारहाण केली, त्यामुळे त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला.
  • आरोपी क्रमांक 1 आणि 4 यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपास सपोनि राहुल साबळे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments