Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडामहाराष्ट्रातील 'शरीररसौष्ठव' डोळे दिपवणार! प्रभादेवीत रविवारी रंगणार 'स्वामी समर्थ श्री' स्पर्धा

महाराष्ट्रातील ‘शरीररसौष्ठव’ डोळे दिपवणार! प्रभादेवीत रविवारी रंगणार ‘स्वामी समर्थ श्री’ स्पर्धा

महाराष्ट्रातील ‘शरीररसौष्ठव’ डोळे दिपवणार! प्रभादेवीत रविवारी रंगणार ‘स्वामी समर्थ श्री’ स्पर्धा

[ad_1]

गेली आठ दशके कबड्डीसह शरीरसौष्ठव खेळात एकापेक्षा एक स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबर खेळाडू घडवणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा आपल्या स्पर्धेला भव्य आणि दिव्य करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून शरीरसौष्ठवांना स्वामी समर्थ श्री मध्ये येणार्‍या आवाहन केले असल्याचे स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी सांगितले. त्यामुळे सुमारे सव्वाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. सव्वा तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार्‍या या स्पर्धेत विजेत्याला ५५,५५५ रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच उपविजेत्याच्या मेहनतीलाही प्रोत्साहन म्हणून २२,२२२ रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोवरील अशा एकंदर सात गटात खेळली जाणार असून प्रत्येक गटात अव्वल तीन खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासह पहिल्या पाच खेळाडूंना १०, ८, ६, ४ आणि ३ हजार अशी रोख रकमेची बक्षीसेही दिली जातील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments