Tuesday, August 25, 2026
Homeसाताराएसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी व अन्य मागण्यांसाठी फलटण आगारासमोर निदर्शने

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी व अन्य मागण्यांसाठी फलटण आगारासमोर निदर्शने

फलटण, ५ मार्च २०२५ – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी महामंडळ) प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी आज फलटण आगाराच्या गेटसमोर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

संघटनेने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या:

1️⃣ दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील थकबाकी त्वरित अदा करावी.
2️⃣ २०१८ च्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी.
3️⃣ २०१६ ते २०२० दरम्यान घोषित केलेल्या वेतनवाढीतील घरभाडे भत्ता ८, १६, २४ टक्क्यांनी वाढवून थकबाकी अदा करावी.
4️⃣ वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के करावा आणि राहिलेली थकबाकी अदा करावी.
5️⃣ शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ५३% महागाई भत्ता थकबाकीसह द्यावा.
6️⃣ भविष्य निर्वाह निधीतून कर्मचाऱ्यांना मागणीनुसार त्वरित उचल द्यावी.
7️⃣ अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन प्रणाली लागू करावी.

या निदर्शनांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनावले, सचिव योगेश भागवत, संघटक सचिव गणेश सावंत, खजिनदार निरप्पा वाघमोडे, विभागीय सदस्य सुरेश अडगळे, बाळासाहेब जगताप, सुजित जगताप, तसेच ज्येष्ठ नेते सुरेश पन्हाळे, दत्तात्रय कोळेकर, दीपक बेलदार, विलास डांगे, प्रवीण बोबडे, गणेश ननवरे, महेश अनिल भोसले, सागर चांगण, निलेश बोधे, नितीन शिंदे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

कामगार संघटनेने स्पष्ट केले की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments