Thursday, August 13, 2026
Homeसातारामहाबळेश्वर येथे जैन सोशल ग्रुपच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

महाबळेश्वर येथे जैन सोशल ग्रुपच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

फलटणच्या जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम आणि युवा फोरमचा भव्य सन्मान

फलटण :- महाबळेश्वर  येथे नुकताच जैन सोशल ग्रुप व महाराष्ट्र रिझनचा कॉन्फरन्स आणि भव्य अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून विविध प्रतिनिधी व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुप फलटण, संगिनी फोरम, फलटण आणि युवा फोरम, फलटण या तीनही गटांचा गौरव करण्यात आला. जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी यांना “बेस्ट प्रेसिडेंट”, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांना “बेस्ट प्रेसिडेंट”, तर युवा फोरमचे सचिव श्री. पुनीत दोशी यांना “बेस्ट सचिव” या सन्मानाने गौरविण्यात आले.

सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याचा सन्मान

सन 2023 ते 2025 या कार्यकाळात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझनतर्फे या गटांना विशेष सन्मान मिळाला.

या गौरव सोहळ्यात जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे निर्वाचित अध्यक्ष मा. श्री. बिरेनभाई शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष मा. श्री. उन्मेशभाई करनावट, अवॉर्ड कमिटी कन्व्हेनर मा. सौ. प्रीतीभाभी करनावट, इंटरनॅशनल डायरेक्टर मा. श्री. प्रीतेश तातेड, मा. श्री. महावीरजी पारेख, सोलापूर झोन कोऑर्डिनेटर मा. श्री. सुनिल लोढा आणि कोल्हापूर झोन कोऑर्डिनेटर मा. सौ. रज्जूबेन कटारिया यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याच वेळी, शरदभाई शहा स्मृति अभियान अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप, फलटण यांना “रत्न स्तंभ पुरस्कार”, तर संगिनी फोरम, फलटण यांना “सुवर्ण स्तंभ पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.

व्यापारी महासंघाचे विशेष अभिनंदन

या तिन्ही गटांच्या यशाबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. मंगेश दोशी, श्रीराम बझारचे संचालक मा. श्री. तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष मा. श्री. श्रीपाल जैन, सचिव मा. श्री. प्रीतम शहा, खजिनदार मा. श्री. समीर शहा, माजी अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र कोठारी, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षा मा. सौ. स्मिता शहा, माजी अध्यक्षा मा. सौ. नीना कोठारी, संगिनी फोरम सचिव मा. सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार मा. सौ. मनीषा घडिया, युवा फोरम अध्यक्ष मा. श्री. तेजस शहा, खजिनदार मा. श्री. मिहीर गांधी आणि तिन्ही गटांचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन केले.

पुरस्कार विजेत्यांनी हा सन्मान मिळवण्यासाठी जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि संपूर्ण टीमच्या सहकार्याचे विशेष योगदान असल्याचे नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments