शिवशंकर माध्य. विद्यालयाच्या इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

0
2
शिवशंकर माध्य. विद्यालयाच्या इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

फलटण (सासकल) – मौजे सासकल येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच अभ्यासातील यशासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक नारायण मदने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून उज्वल यश संपादन करावे. आपल्या शाळेचे, आई-वडिलांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.” त्यांनी शाळेच्या शैक्षणिक परंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्या परंपरेला साजेसे यश मिळवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य श्रीमंतराव धोंडिबा घोरपडे आणि प्राचार्य तथा पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव महादेव सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासाच्या योग्य पद्धती, उत्तरपत्रिकेचे नियोजन आणि परीक्षेतील काळजीचे मुद्दे याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.

कार्यक्रमास अनमोल किराणा स्टोअरचे प्रोप्रायटर विठ्ठल मुळीक, पैलवान तथा मा. उपसरपंच दत्तात्रय दळवी, अंगणवाडी मदतनीस दीपाली पवार, अंगणवाडी सेविका पुष्पाताई मुळीक, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय प्रभू कर्णे, शिक्षक चंद्रकांत सुतार, अरुण झगडे, वैशाली सस्ते, गोडसे मॅडम, बाळू सोनवणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ उपस्थित होते.

गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले, उपसरपंच सोनाली मंगेश मदने, जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख शारदा देवी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम आणि सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक आणि पालकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.