Sunday, October 4, 2026
Homeक्रीडाभव्य राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन फलटणमध्ये

भव्य राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन फलटणमध्ये

फलटण : श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २६ जानेवारी २०२५ रोजी अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण, जि. सातारा येथे भव्य राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये:
या राज्यस्तरीय स्पर्धेत चार वयोगटांमध्ये सामने होणार आहेत:

  1. खुला गट
  2. १४ वर्षाखालील गट
  3. १२ वर्षाखालील गट
  4. १० वर्षाखालील गट

स्पर्धेमध्ये बेस्ट फलटणकर, उत्कृष्ट कन्या (१४ वर्षाखालील), सर्वोत्कृष्ट अनुभवी (६० वर्षांवरील), सर्वोत्कृष्ट दिव्यांग, आणि उत्कृष्ट अकॅडमी या श्रेणींमध्ये विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. एकूण रोख बक्षिसांची रक्कम रु. ३२०००/- असून, चिफ ऑर्बिटर म्हणून शार्दुल तपासे (IA) काम पाहतील.

मार्गदर्शन:
या स्पर्धेसाठी कोहिनूर चेस अकॅडमी, श्री. माने बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग, आणि डॉ. जयंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सहभाग नोंदणी:

  • प्रवेश फी: रु. २००/-
  • संपर्क:
    • श्री. प्रमोद माने: ८००७५४४६११
    • सुजीत जाधव, कोहिनूर चेस अकॅडमी
    • श्री. सौरभ तेली: ८८८८६४४३५२
    • श्री. आशिष शिंदे (भैय्या): ९७३०००४८२७

सर्व बुद्धिबळप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments