Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात वकील महिलेच्या छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; खळबळजनक प्रकार उघडकीस

पुण्यात वकील महिलेच्या छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; खळबळजनक प्रकार उघडकीस

पुणे : अनैतिक संबंधातून एका वकील महिलेकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पत्नीला सोडून माझ्याबरोबर रहा, तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करुन दे आणि ३० लाख रुपयांची परतफेड कर अथवा सुस येथील फ्लॅट नावावर कर असा तगादाच या वकील महिलेने लावला होता. या प्रकरणी बडंगार्डन पोलिसांनी माढा तालुक्यातील वकील महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

अंकुश डांगे (वय ४५, रा. बालेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत माढा तालुक्यातील ४२ वर्षांच्या वकील महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी महिला वकिल व अंकुश डांगे यांची व्यवसायातून ओळख झाली. त्यातून मैत्री व प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

यातूनच डांगे यांनी या महिलेकडून स्वतःच्या बार आणि मंगल कार्यालयाच्या कामासाठी ३० लाख रुपये घेतले होते. हे पैसे माघारी दे नाहीतर पुण्यातील फ्लॅट नावावर कर असा तगादा या महिलेने लावला होता. एवढ्यावरच न थांबता या महिलेने पत्नीला सोडून माझ्यासोबत रहा, माझ्या मुलीचं तुझ्या मुलासोबत लग्न लावून दे असाही आग्रह लावून धरला होता. अशातच दि. ९ जानेवारी रोजी या महिलेने डांगे यांना पुणे स्टेशन येथील एका लॉजवर बोलावून घेतले.

त्या ठिकाणी तू पत्नीला सोडून देऊन माझ्यासोबत रहा, नाहीतर आत्महत्या कर असं म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्यावेळी अंकुश डांगे यांनी या वकील महिलेसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद डांगे यांच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार बडंगार्डन पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या वकील महिलेचे पती न्यायाधीश असल्याची माहितीही आता समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments