Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्र"फडणवीस, तुमचं पोलीस खातं भ्रष्ट झालंय!" – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

“फडणवीस, तुमचं पोलीस खातं भ्रष्ट झालंय!” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

मुंबई: “देवेंद्र फडणवीस, तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झालंय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही,” असे परखड शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली

आंबेडकर म्हणाले की, “फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर नियंत्रण नाही. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस, पोलीस अधीक्षक, आणि CID अशा विविध पातळ्यांवर झाला, पण काहीही निष्कर्ष निघाला नाही. आता SIT स्थापन केली आहे. पुढे काय? CBI चौकशी होणार का?”

आंबेडकरांनी फडणवीसांना सल्ला दिला की, “ज्यांनी तपास लावला नाही, त्यांना विचारून उत्तर नसेल, तर त्यांना निलंबित करा.”

सरपंच हत्येप्रकरणातील न्यायासाठी आंबेडकरांचा स्पष्ट आवाज राज्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments