जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली; संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी

0
8
जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली; संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी


सातारा, दि. २ (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बदली पुणे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संतोष पाटील यांची नियुक्ती झाली आहे. डूडी यांनी आपल्या अठरा महिन्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.

डूडी यांनी ७ जून २०२३ रोजी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात महाबळेश्वर आणि कास पठार येथील अतिक्रमणांवर कठोर कारवाई, स्मार्ट स्कूल आणि स्मार्ट पीएचसी प्रकल्पांची अंमलबजावणी, गौण खनिज महसूल वाढ, तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे नियोजन अशा अनेक उपक्रमांनी जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने डूडी यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. ते लवकरच पुणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, तर संतोष पाटील सातारा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतील.