बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमी प्रकरण: प्रशासनाची दिरंगाई, मोहसीन पठाण यांचा गंभीर आरोप

0
2
बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमी प्रकरण: प्रशासनाची दिरंगाई, मोहसीन पठाण यांचा गंभीर आरोप

बारामती: बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाईचा आदेश होऊनही प्रशासनाची दिरंगाई सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केला आहे. अंतिम फायर एनओसी नसलेल्या या अकॅडमींवर चार महीने उलटूनही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उलट, ‘इंटीमेशन नोटिस’च्या नावाखाली या अकॅडमींना वाचवण्याचा प्रकार सुरू असल्याचे पठाण यांचे म्हणणे आहे.

तात्पुरत्या एनओसींच्या आधारे बेकायदेशीर कामकाज

बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने बेकायदेशीर अकॅडमींना तात्पुरत्या एनओसी दिल्या होत्या. यावर आक्षेप घेत पठाण यांनी पत्रव्यवहार आणि आंदोलन करत कारवाईची मागणी केली होती. माहिती अधिकारात कागदपत्रे मागूनही ती वेळेत न दिल्यामुळे, या प्रकरणात काळेबेरे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

चौकशीचे आदेश आणि प्रशासनाची टाळाटाळ

वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशीचे आदेश देऊनही अग्निशमन विभागाने आजवर कोणतीही कारवाई केली नाही. अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्य