Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रBeed: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार; बीडमधील धक्कादायक घटना

Beed: दारू प्यायला नकार दिला म्हणून तरुणावर कोयत्यानं वार; बीडमधील धक्कादायक घटना

[ad_1]

Beed News: बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या घटनेला महिना उलटला नाही, तोच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील स्वाराती रुग्णालयाजवळील पोलीस चौकीसमोरच एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या तरुणाने दारु प्यायला नकार दिल्यानंतर पेटलेल्या भांडणातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments