Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्र"आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा: पत्नीच...

“आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा: पत्नीच निघाली सूत्रधार!”


पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि प्रसिद्ध उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिस तपासात वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे.

९ डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या घडल्याचा संशय आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले व चार आरोपींना अटक केली. काल धाराशिव येथून पाचव्या आरोपीला अटक झाल्यानंतर पत्नीच मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं. सध्या गुन्हे शाखेने तपास अधिक गतिमान केला असून या घटनेमागील सत्य पुढे येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments