
Happy Birthday Nagma : ९०च्या दशकात अनेक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींचा एक वावर सिनेमाच्या दुनियेत दिसला. त्यातच एक नाव होतं नगमा. अभिनेत्री नगमा, जी एक काळी सुपरस्टार्ससोबत रोमँटिक भूमिका साकारत होती, ती आज इंडस्ट्रीपासून दूर, गुमनामीचं आयुष्य जगत आहे. २५ डिसेंबर १९७४ रोजी मुंबईत जन्मलेल्या नगमाचा एक राजघराण्याशी संबंध आहे. नगमाचं खरं नाव नंदिता अरविंद मोरारजी. तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली, तेव्हा ती ‘नगमा’ या नावाने ओळखली जाऊ लागली.








