‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना! सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेसह ३१ सदस्यांचा समावेश

0
13
‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना! सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेसह ३१ सदस्यांचा समावेश


One Nation One Election Bill : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेची संयुक्त समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.  या समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० असे एकूण ३१ सदस्य असतील.  मनीष तिवारी, धर्मेंद्र यादव, कल्याण बॅनर्जी,  संबित पात्रा, अनिल बलूनी, अनुराग सिंह ठाकूर यांचीदेखील  जेपीसीसदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहातील संख्याबळाच्या दृष्टीने पॅनेलमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत.



Source link