
Fahadh Faasil Bollywood debut: ‘पुष्पा २’ या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेता फहाद फासिलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फहाद फसिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. पुष्पा २ मध्ये फहाद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. फहाद लवकरच नॅशनल क्रश, बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार आहे. या चित्रपटातून फहाद फसिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दुसरे कोणी नसून बॉलिवूडचे उत्तम दिग्दर्शक इम्तियाज अली करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.







