Monday, September 14, 2026
Homeक्रीडासाताऱ्यातील खेळाडूंनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले: सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

साताऱ्यातील खेळाडूंनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले: सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

फलटण, 3 डिसेंबर हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्रतर्फे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावर सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी दि हॉकी सातारा संघटनेच्या चार खेळाडूंमध्ये कु. तेजस्विनी कर्वे, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे, आणि कु. निकिता वेताळ यांची निवड झाली होती.

त्यातील कु. निकिता वेताळ आणि कु. तेजस्विनी कर्वे यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सिकंदराबाद येथे होणाऱ्या सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळवले आहे.

सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात हा मानाचा तुरा असल्याचे दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव आणि ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तथा तालुका क्रीडा अधिकारी (नि.) श्री. महेश खुटाळे यांनी सांगितले.

या खेळाडूंना श्री. महेश खुटाळे आणि हॉकी प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ यांनी प्रशिक्षण दिले. तसेच, श्री. बी.बी. खुरंगे यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून योगदान दिले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. सुधीर अहिवळे, आणि दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments