Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रदत्तात्रय गिलबिले यांच्या निघृण हत्येचा उलगडा: संशयातून शिक्रापूर पोलिसांनी १२ तासांत पकडला...

दत्तात्रय गिलबिले यांच्या निघृण हत्येचा उलगडा: संशयातून शिक्रापूर पोलिसांनी १२ तासांत पकडला आरोपी

पुणे :- – शिक्रापूर गावातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार व माजी उपसरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले यांची रविवारी, दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या निघृण घटनेनंतर पोलिसांनी केवळ १२ तासांत आरोपी पप्पू नामदेव गिलबिले याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेचा तपशील

रविवारी दुपारी दत्तात्रय गिलबिले आपल्या घरासमोर बसले असताना, शेजारील पप्पू गिलबिले याने धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर, पोटावर, आणि छातीवर वार केले. आरडाओरड ऐकून दत्तात्रय यांच्या पत्नी रोहिणी गिलबिले घराबाहेर आल्या असता, त्यांनी जखमी अवस्थेतील पतीला पाहिले. जखमी दत्तात्रय यांनी पत्नीला सांगितले की, पप्पू गिलबिले यानेच त्यांच्यावर हल्ला केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुण्यात हलवण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

हत्येमागील कारण

पोलिसांच्या माहितीनुसार, पप्पू गिलबिले याला दत्तात्रय गिलबिले हे पत्नीशी चॅटिंग करत असल्याचा संशय होता. वर्षभरापूर्वी यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर सातत्याने वाद उफाळत होते, आणि याच वैमनस्यातून पप्पूने हा हल्ला केल्याचे समजते.

जलद पोलिस कारवाई

घटनेनंतर पप्पू गिलबिले फरार झाला होता. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार शिक्रापूरसह संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडवणारा ठरला असून, पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments