Tuesday, August 11, 2026
Homeसाताराचव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे मान्यवरांनी वाहिली आदरांजली

चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे मान्यवरांनी वाहिली आदरांजली

सातारा :- कराड येथील प्रितीसंगम बागेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार आणि फलटणचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

या प्रसंगी ना. अजितदादा पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारा आणि आदर्शांचे स्मरण करून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या श्रद्धांजली कार्यक्रमात स्व. चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करत सर्व मान्यवरांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या विचारांनुसार कार्य करण्याचा निश्चय व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments