Tuesday, September 15, 2026
Homeसाताराबौद्ध उमेदवार प्रा. रमेश आढाव यांनी गुणवरे येथे बजावला मतदानाचा

बौद्ध उमेदवार प्रा. रमेश आढाव यांनी गुणवरे येथे बजावला मतदानाचा

फलटण :- अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात संविधान समर्थन समितीच्या पाठिंब्याने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी गुणवरे येथे ग्रामस्थांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

बौद्ध समाजाला या मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी संविधान समर्थन समितीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे केले होते. या चळवळीच्या पार्श्वभूमीवर प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी देण्यात आली.

मतदानानंतर प्रा. रमेश आढाव यांनी सांगितले, “ही निवडणूक सर्वसामान्यांच्या घटनात्मक हक्कांची आणि विकासाची आहे. मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे,” असे त्यांनी आवाहन केले.

या निवडणुकीत बौद्ध समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत जनतेमध्ये उत्सुकता असून, घटनात्मक हक्कांच्या प्रश्नावर या निवडणुकीत मोठा जनाधार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments