Monday, September 14, 2026
Homeसाताराहक्काचा लढा: ऍड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा दहिवडीत

हक्काचा लढा: ऍड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा दहिवडीत

दहिवडी (माण): वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दहिवडी बाजार पटांगणावर होणार आहे. ही सभा माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज नदाफ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, राज्य प्रवक्ते अरुण आबा जाधव, अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संयोजकांनी तमाम बहुजनवादी आणि आंबेडकरी जनतेला आवाहन केले आहे की, ही आपल्या हक्क व अधिकारांची जाणीव करून देणारी आणि एकजुट दाखविण्याची नामी संधी आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऍड. आंबेडकर यांचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माण-खटाव मतदारसंघातील बहुजन शक्तीला एकत्र आणण्यासाठी ही सभा महत्वाची मानली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments