nimrat kaur : अभिषेक आणि निम्रतच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना बिग बींनी पत्र लिहून केलं अभिनेत्रीचं कौतुक!

0
13
nimrat kaur : अभिषेक आणि निम्रतच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना बिग बींनी पत्र लिहून केलं अभिनेत्रीचं कौतुक!

Amitabh Bachchan Letter To Nimrat Kaur : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निम्रत कौर यांच्या डेटिंगच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चांगल्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. दोघांनीही याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण त्याच दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यात त्यांनी निम्रत कौरच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे. हे पत्र दोन वर्षे जुने असले तरी, यामुळे निम्रतच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली आहे.

Source link