Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी जोशाबा समतापत्र जाहीर! - महिला, शेतकरी आणि...

वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी जोशाबा समतापत्र जाहीर! – महिला, शेतकरी आणि ओबीसीसाठी ठोस आश्वासने


पुणे : – राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, विविध राष्ट्रीय पक्षांनी जाहीरनामे अद्याप प्रसिद्ध केलेले नाहीत. मात्र, वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला असून, पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘जोतिबा, शाहू, बाबासाहेब विचारांनी प्रेरित’ 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘जोशाबा समतापत्र’ हा जाहीरनामा पुण्यात प्रसिद्ध केला.

आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी दरमहा 3500 रुपये वेतन, शेतकऱ्यांना हमीभावासाठी कायदा, ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षण वेगळे ठेवणे आणि सर्वांना KG ते PG मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धर्म धोक्यात नसून आरक्षण धोक्यात आहे, असे ठाम मत जाहीरनाम्यातून मांडण्यात आले आहे.

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे:

धर्म धोक्यात नाही, आरक्षण धोक्यात आहे!

बोगस आदिवासींच्या दाखल्यांची रद्दीकरणाची हमी.

मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी व जात जणगणना.

महिलांना 3500 रुपये मासिक वेतन.

शेतमालाला हमीभाव देणारा कायदा.

पारलिंगी व्यक्तींना मासिक 5000 रुपये पेन्शन.

नवीन उद्योगांना अनुदान, 200 युनिट घरगुती व 300 युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत.

आशा आणि अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा.

गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण.

बौद्ध अनुयायांना मोफत धम्म यात्रा.

बेरोजगार सुशिक्षित तरुणांना 2 वर्षापर्यंत दरमहा 5000 रुपये भत्ता.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख आणि पुणे विधानसभेतील आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी विश्वास व्यक्त केला की हा जाहीरनामा जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळवेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मते मिळतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments