Monday, September 14, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगाव निवडणुकीत १२ उमेदवारांची माघार; दीपक चव्हाण, सचिन पाटील, दिगंबर आगवणे, प्रा....

फलटण-कोरेगाव निवडणुकीत १२ उमेदवारांची माघार; दीपक चव्हाण, सचिन पाटील, दिगंबर आगवणे, प्रा. रमेश आढाव यांची निवडणूक तयारीला वेग


फलटण | फलटण-कोरेगाव (अजा) विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी फलटण तहसील कार्यालयात झाली होती.

दीपक चव्हाण चौथ्यांदा निवडणूक रिंगणात –
या मतदारसंघातून सन २००९, २०१४ आणि २०१९ निवडणुकांमध्ये सलग तीन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण यांनी चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महायुतीचे सचिन पाटील देणार दमदार फाईट –
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे सचिन सुधाकर पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

संविधान संघर्ष समितीच्या वतीने प्रा. रमेश आढाव निवडणूक लढवणार –
“एकच निर्धार; बौद्ध आमदार” या उद्दिष्टाने संविधान संघर्ष समितीने फलटण-कोरेगाव मतदारसंघात बौद्ध प्रतिनिधी म्हणून प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तर्फे आढाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून संविधान संघर्ष समितीचा त्यांना ठाम पाठिंबा आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिगंबर आगवणे मैदानात –
या मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवून लक्षणीय मते मिळवलेले दिगंबर आगवणे यांनी यावेळी राष्ट्रीय समाज पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांनीही दोन अर्ज दाखल केले होते, त्यापैकी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिगंबर आगवणे निवडणूक रिंगणात आहेत.

अपक्ष उमेदवारांची प्रभावी उपस्थिती –
अपक्ष उमेदवार म्हणून विविध नेत्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या सौ. प्रतिभा शेलार, वंचित बहुजन आघाडीचे सचिन जालिंदर भिसे आणि दिपक रामचंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये अमोल मधुकर करडे, अॅड. कांचनकन्होजा खरात, कृष्णा काशिनाथ यादव, गणेश वाघमारे, चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव, आणि सूर्यकांत मारुती शिंदे यांची नावेही आघाडीवर आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments