Arvind Sawant: शायना एनसी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अरविंद सावंत यांनी मागितली माफी

0
19
Arvind Sawant: शायना एनसी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अरविंद सावंत यांनी मागितली माफी


Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माफी मागितली. ‘मी आयुष्यात कधीही कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय कारणास्तव वाद निर्माण करण्यात आला, असे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महिलांना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी नेहमीच अग्रेसर आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि जाहीर माफी मागतो.



Source link