Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशVIDEO: मजुरी करण्यास नकार दिल्याने उलटं लटकावून मारलं; हात बांधून मुंडन केले...

VIDEO: मजुरी करण्यास नकार दिल्याने उलटं लटकावून मारलं; हात बांधून मुंडन केले अन् गावातून फिरवलं

[ad_1]

यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा तर जोरदार होत असते.  काही लोकांवर त्याचा काहीच परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. ते आपले वर्चस्व दाखवत राहतात. त्यांच्यावर ना कायद्याचा धाक दसतो ना  सरकारच्या काटेकोरपणाचा परिणाम. असाच एक प्रकार झाशीतून समोर आला आहे. येथे म्हशीला चारा घालण्यास व  शेण उचलण्यास नकार दिल्याने मजुरासोबत क्रौर्याचा कळस गाठल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मजुराला आधी झाडाला उलटे लटकवून बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याचे हात बांधून त्याचे मुंडन करण्यात आले. त्यानंतर त्याला संपूर्ण गावातून फिरवण्यात आले. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एक्सवर मजुराचे डोके मुंडवल्याचा व्हिडिओ पोस्ट करून काँग्रेसने योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सिपरी बाजारमधील एका गावातील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments