मोठी बातमी..! भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; रोहित पाटलांविरुद्ध थोपटले दंड

0
2
मोठी बातमी..! भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; रोहित पाटलांविरुद्ध थोपटले दंड


Tasgaon Kavathe Mahankal Assembly constituency :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात नवे समीकरण समोर आले आहे. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत हातात घड्याळ बांधले आहे. तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभेच्या रिंगणात स्वत: संजयकाका उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. 



Source link