Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रइंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दमदार शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा...

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दमदार शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस निश्चित


इंदापूर :- भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वाजता इंदापूर येथील वाघ पॅलेस येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षात प्रवेश केला होता, जिथे त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. गुरुवारी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस ठरला आहे आणि या निमित्ताने शक्तिप्रदर्शन होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments