Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशShare Market : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे मोठे...

Share Market : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

[ad_1]

Share Market : 22 ऑक्टोबर रोजी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 80,800 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी निफ्टीदेखील 100 हून अधिक अंकांनी घसरला आहे. सध्या 24,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर बँक निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांकांनीही 0.10 टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार सुरु केला आहे. 

आज शेअर मार्केटमध्ये डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 344 अंकांची घसरण दिसून आली आहे. बाजारासाठी जागतिक संकेत आज 42931.60 च्या पातळीवर बंद झाले. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकन बाजारातही मोठी घसरण दिसून आली होती. NASDAQ कंपोझिटमध्ये 50 अंकांची वाढ झाली असून तो 18540 च्या पातळीवर बंद झाला आहे तर S&P 500 निर्देशांक सुमारे 11 अंकांनी कमकुवत होऊन 5853.98 च्या पातळीवर बंद झाला आहे. 

आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाले तर, GIFT NIFTY फ्लॅट आहे तर Nikkei 225 1.45 टक्क्यांनी घसरत आहे. स्ट्रीट्स टाइम्समध्ये 0.11 टक्के कमजोरी आहे तर हँग सेंग हा पूर्णपणे घसरला आहे. तैवान वेटेड 0.58 टक्क्यांनी कमकुवत झाले आहे, तर कोस्पीमध्ये 1.01 टक्क्यांनी घट झाली आहे. शांघाय कंपोझिट 0.06 टक्के वाढ दर्शवत आहे.

सर्वाधिक तेजीत असणारे शेअर्स- POWERGRID, ICICIBANK, INFY, TECHM, TITAN

आज सर्वात जास्त घसरलेले शेअर्स- BAJAJ-AUTO, TATACONSUM, SBILIFE, KOTAKBANK, TATASTEEL

एनएसईवर एफ अँड ओ अंतर्गत बॅन यादी

आरती इंडस्ट्रीज, बंधन बँक, बिर्लासॉफ्ट, चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, जीएनएफसी, ग्रॅन्युल्स इंडिया, हिंदुस्तान कॉपर, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडिया एनर्जी एक्सचेंज, इंडियामार्ट इंटरमेश, एल अँड टी फायनान्स, मणप्पुरम फायनान्स, पिरामल एंटरप्रायझेस, पीएनबी, आरबीएल बँक हे आज 22 ऑक्टोबर रोजी एनएसईवर F&O अंतर्गत बंदी शेअर्सच्या यादीमध्ये आहेत.

आयपीओचा दुसरा दिवस

आज 22 ऑक्टोबर आयपीओचा दुसरा दिवस आहे. हे IPO दीपक बिल्डर्स अँड इजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि वारी एनर्जी लिमिटेड कंपनीचे असतील. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 23 ऑक्टोंबरपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE)वर 28 ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध केले जातील.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments