फलटण :- फलटण तालुक्यातील काळज गावात नितीन तकदीर मोहिते यांची लक्ष्मी मंदिरासमोर बसले असताना ५ ते ६ अज्ञात इसमांकडून चाकू व कोयत्याने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून आले होते आणि अचानक हल्ला करत मोहिते यांचा जीव घेतला. या घटनेनंतर, पोलिस पाटील प्रदीप उर्फ कैलास गाढवे यांनी तात्काळ लोणंद पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपींचा तपास लागण्याची शक्यता आहे.
लक्ष्मी मंदिरासमोर नितीन मोहितेची निर्घृण हत्या – ५ ते ६ अज्ञात इसमांचा हल्ला
By SahasTimes
0
42
RELATED ARTICLES
