Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रBaba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुणे...

Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुणे कनेक्शन आलं समोर!

[ad_1]

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा व आमदार झिशान याच्या कार्यालयासमोर ३ जणांनी त्यांच्यावर गोळीवार केला. ३ ते ४ राऊंड फायरिंग केली होती. यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल रात्रीच बेड्या ठोकल्या असून तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. तिसऱ्या आरोपीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून सिद्दीकी हत्या प्रकरणातील पुणे कनेक्शन उघड झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments