Mumbai Fire : चेंबूर आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

0
2
Mumbai Fire : चेंबूर आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा


मुंबईतील एका दुमजली दुकान आणि रहिवासी इमारतीला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत तीन अल्पवयीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. या तळ मजला दुकान म्हणून आणि वरचा मजला राहण्यासाठी म्हणून वापरला जात होता. सुरूवातीला तळमजल्यावर आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पॅरिस गुप्ता (वय, ७), मंजू प्रेम गुप्ता (वय, ३०), अनिता प्रेम गुप्ता (वय, ३९), प्रेम गुप्ता (वय, ३०), नरेंद्र गुप्ता (वय, १०), विधी गुप्ता (वय, १५), गितादेवी गुप्ता (वय, ६०) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.



Source link