Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रशक्ती सुरक्षा मोहीम बारामतीत सुरू: महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य

शक्ती सुरक्षा मोहीम बारामतीत सुरू: महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य

बारामती :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (३ ऑक्टोबर) पुणे जिल्ह्यातील बारामतीत महिला, मुले आणि लोकांच्या सुरक्षेसाठी ‘पंच शक्ती’ हा पाच-स्तरीय उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. बारामतीमधील महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या बारामतीत १२ वीच्या मुलाची दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी हत्या केल्याने चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामतीमध्ये सुरक्षा उपाय वाढवण्यात येणार असून, विशेषतः महिला आणि मुलांवर लक्ष केंद्रित केले जाईल.”

या उपक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका, व्यावसायिक आस्थापना आणि इतर ठिकाणी ‘शक्ती बॉक्स’ बसवले जातील. यामुळे महिलांना कोणत्याही भीतीशिवाय छेडछाड आणि विनयभंगाच्या तक्रारी करता येतील. याशिवाय, ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ड’ या टॅगलाइनसह २४/७ उपलब्ध असलेली हेल्पलाइन (9209394917) देखील सुरू करण्यात आली आहे.

पवार पुढे म्हणाले, “पोलिस स्टेशन स्तरावर ‘शक्ती सेल’ तयार करण्यात येणार असून, तेथे दोन महिला पोलीस असतील. ‘शक्ती नजर’ हा भाग ऑनलाइन छळ आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवणार आहे. ‘शक्तीभेट’ कार्यक्रमांतर्गत महिला आणि मुलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता सत्रे आयोजित करण्यात येतील.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments