Saturday, September 19, 2026
Homeसाताराठाम निर्धार : फलटण-कोरेगाव मतदारसंघातून बौद्ध समाजाला आमदारकीची मागणी

ठाम निर्धार : फलटण-कोरेगाव मतदारसंघातून बौद्ध समाजाला आमदारकीची मागणी

फलटणः फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी, अशी ठाम मागणी संविधान समर्थक समितीने तालुक्यातील प्रमुख नेत्यांकडे केली आहे. या मागणीसाठी गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, बौद्ध समाजातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आगामी निवडणुकीत बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवत आहेत.

मतदारसंघातील बौद्ध समाज गेल्या १५ वर्षांपासून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्र येत होता, मात्र मोठ्या प्रमाणात असलेल्या बौद्ध समाजाला अद्याप प्रमुख पक्षांनी संधी दिलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत बौद्ध समाजाने ठामपणे आमदारकीची मागणी केली आहे.

‘एकच निर्धार ‘ बौद्ध आमदार’ या टॅगलाईन खाली .आयोजित महामेळाव्यात समाजाच्या आगामी वाटचालीची दिशा निश्चित करण्यात आली. संविधान समर्थन समितीने या मागणीच्या पुढील टप्प्यातील कामाला गती दिली आहे, ज्याला बौद्ध बांधवांचा मोठा पाठींबा मिळत आहे. समाजातील लोक बहुसंख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ देत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments