Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा बारामती दौरा: विकासकामांचे भूमिपूजन आणि कार्यकर्ता मेळावे

अजित पवारांचा बारामती दौरा: विकासकामांचे भूमिपूजन आणि कार्यकर्ता मेळावे

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ६ वाजता पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बारामतीतील अलीकडच्या घटनांचा आढावा घेतील. या बैठकीनंतर वृंदावन गार्डन, पाटस रस्त्यावर सकाळी १० वाजता बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, ज्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

याशिवाय, दुपारी १.३० वाजता होळ येथील सोमनाथ मंगल कार्यालयात आणखी एक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असून, त्यानंतर ३.३० वाजता जळगाव कडेपठार येथील विकास सोसायटीचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी ४ वाजता काहाटी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तर ५ वाजता सुपे येथील विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे. यानंतर, सुपे येथील माऊली गार्डनमध्ये बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा होईल, जिथे अजित पवार पुन्हा मार्गदर्शन करणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments