
[ad_1]
Rahul Gandhi : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी येत्या शुक्रवारी व शनिवारी (४ व ५ ऑक्टोबर) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
[ad_2]
Source link
