बारामती :-बारामती तालुक्यातील शिरवली येथे रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी तलवारी, गज, आणि दांडक्यांच्या धाकाने तब्बल ९ लाख ८० हजार रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीच्या या घटनेदरम्यान, चोरट्यांनी प्रतिकार करणाऱ्यांवर हल्ला करत पाचजणांना गंभीर जखमी केले.
विशेष म्हणजे, घराबाहेर उभी असलेल्या इरटीगा गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिरवली गावात तसेच संपूर्ण बारामती तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घटनेनंतर तातडीने माळेगाव पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
अधिक माहिती:
सदर घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी हल्ला करत घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. पाचजण जखमी झाल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले आहे. माळेगाव पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून लवकरच आरोपींना अटक होईल, अशी अपेक्षा आहे.