Sunday, September 20, 2026
HomeUncategorizedसावकारांच्या चक्रवाढ व्याजाने एक तरुण आत्महत्येला प्रवृत्त

सावकारांच्या चक्रवाढ व्याजाने एक तरुण आत्महत्येला प्रवृत्त

दहिवडी : सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द येथील 28 वर्षीय सूरज सुनील शिलवंत याने सावकारांच्या चक्रवाढ व्याजाच्या तणावामुळे आत्महत्या केली. या घटनेनंतर गोंदवले खुर्द आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिलवंतच्या परिवाराच्या वतीने आणि विद्रोही सामाजिक संघटनेच्या आह्वानावरून दहिवडी येथे एक मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात आझाद समाज पार्टी प. महा. अध्यक्ष व कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांनी भाषण देत निषेध व्यक्त केला आणि सावकारांच्या गैरवर्तनावर कडक कारवाईची मागणी केली. काकडे यांनी सरकारकडे सावकारांच्या चक्रवाढ व्याजविरोधी कठोर कायदे करण्यात यावे, अशी मागणी केली.

सामाजिक संघटनांनी आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या सावकारांविरुद्ध ठोस कारवाईची मागणी केली असून, या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments